भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ साली महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह करून ते पाणी सर्वांना खुले करून जगात क्रांती घडवून आणली.त्याच क्रांती दिनाला २० मार्च २०२७ रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत यानिमित्त केंद्र सरकारने ३०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करावा आणि ऐतिहासिक चवदार तळ्याच्या शंभराव्या वर्धापन दिनाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभेत बोलताना केले.