टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला आज 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना हा कोलकातामधील इडन्स गार्डन्समध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 9 वाजता टॉस झाला. दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन टेम्बा बावुमा याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. आता भारतीय गोलंदाज पाहुण्या संघाला किती धावांवर रोखतात? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, ऋषभ पंतचं कमबॅक, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?