नागपूर : युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दिपावलीचा समावेश झाल्याने भारतीय संस्कृतीला जागतिक स्तरावर मोठा पाठबळ मिळाले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री एँड. आशिष शेलार यांनी सभागृहात या ऐतिहासिक घडामोडीविषयी निवेदन केले.मंत्री शेलार यांनी सांगितले की, दिपावली हा सण अंधारातून प्रकाशाकडे, निराशेतून आशेकडे आणि संघर्षातून यशाकडे नेणारा प्रतीकात्मक सण आहे. महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीशी आणि मराठी परंपरेशी याचे अतूट नाते आहे.
युनेस्कोच्या या मान्यतेमुळे भारतीय सण आणि परंपरा जगभर प्रसारित होण्यास मदत होणार आहे. यापूर्वी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कामगिरीवर आधारित मराठा लष्करी भुरचनेचे युनेस्को मानांकन मिळाले होते, जो मूर्त (tangible) वारसा आहे. “हा ऐतिहासिक गौरव मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे सातत्यपूर्ण पाठपुरावा मोलाचा ठरला. दीपावलीचा जागतिक स्तरावर प्रचार होईल आणि भारतीय संस्कृतीची ओळख वाढेल.”युनेस्कोच्या या मान्यतेने दिपावलीला केवळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावर सांस्कृतिक प्रतिष्ठा मिळाली आहे. हा सण आता भारतीय संस्कृतीचा जागतिक संदेश देणारा उत्सव म्हणून ओळखला जाणार आहे.
