रिपोर्ट प्रशांत पोतदार पेण
अलिबागचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या बद्दल अपशब्द व खोटी अफवा पसरवणाऱ्या अंबादास दानवे यांचा पेण तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या बद्दल अंबादास दानवे यांनी केलेल्या खोट्या अफवे बद्दल शिवसैनिकांत संतापाची लाट उसळ ली असून आज नगरपालिका चौकात शिवसैनिकांनी जमून दानवे यांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचे दहन करण्यात आले यावेळी निषेधात्मक घोषणा देण्यात आल्या तर आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या बद्दल कोणी खोटी अफवा पसवत असेल तर एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक त्यांना सोडणार नाही असा इशारा यावेळी संतप्त शिवसैनिक तसेच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उद्धव कुथे यांनी बोलताना दिला.
उपजिल्हाप्रमुख उध्दव कुथे,तालुका प्रमुख तुषार मानकवळे रोहन म्हात्रे,गजानन म्हात्रे,राहुल पाटील,वंदना पाशिल कर,रेखा तांडेल,सपना राऊत विठोबा पाटील,वनिता पाटील, मानसी ढवले,कल्पना पाटील,नरेश शिंदे,नंदकुमार पाटील.युवराज म्हात्रे.लहुशेठ पाटील,भरत साळवी,भुषण कडु ज्योती म्हात्रे, विश्वास पाटील,प्रकाश रामाने,जीवन पाटील,मंगेश पाटील,अविनाश चव्हाण,दिनेश काडगे.प्रमोद घरत.विश्वास सुर्वे आदी शिवसैनिक उपस्थित होते
