कोकणामधील ओल्या काजूगराची वाढती मागणी व ओल्या काजू बीमधून ओले काजूगर काढताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन डॉ. वाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित काजू संशोधन प्रकल्प, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे सतत पंधरा वर्षाच्या संशोधनानंतर खासकरून ओल्या काजूगरासाठी उपयुक्त काजूचे वाण वेंगुर्ला-१० एमबी या नावाने लागवडीसाठी शिफारस करण्यात आले आहे, अशी माहिती प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. वैभव शिंदे यांनी बोलताना दिली.
कोकणामध्ये ओल्या काजूगराला बाजारात प्रचंड मागणी असते. मोठमोठ्या शहरातील हॉटेल्समध्ये भाजीसाठी, मटण व मच्छी करीध्ये ओले काजूगराचा वापर केला जातो. ओले काजूगर सुक्या भाजीसाठी आणि पुलाव व बीर्याणीमध्ये देखील वापरले जातात. वेगवेगळ्या भाज्यांमधील रस्स्यामध्ये ओले काजूगर जेवणाची लज्जत वाढवितात.
आदिवासी महिला हा रानमेवा मुबलक प्रमाणात विकायला घेऊन येतात. या ओल्या काजूगराला हंगामामध्ये वाजारात खुप मागणी असते. ओले काजूगर हंगामामध्ये ३०० ते ४०० रूपये शेकडा या दराने मिळतात. ओले काजूगराचा हंगाम जानेवारी पासून चालू होतो.
काजूचे फळ तयार होण्यापूर्वी येणारी बी काढून त्यातील गर काढला जातो. ओले काजूगर काढण्यासाठी आदिवासी बांधव उन्हातान्हात बिया काढण्यासाठी जातात. या बीयांना मोठ्या प्रमाणात चिक असतो व त्यांची साल जाड असल्यामुळे बीयांमधून काजूगर काढणे फार अवघड असते. बऱ्याचदा गर काढताना जाडसालीमुळे अखंड गर न मिळला गराचा तुकडा होतो. तसेच वियांमध्ये असलेल्या अधिक चिकामुळे (सीएनएसएल) हात खराव होऊन हाताला इजा होते.
कोकणामधील ओल्या काजूगराची वाढती मागणी व ओल्या काजू बीमधून ओले काजूगर काढताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन डॉ. वाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित काजू संशोधन प्रकल्प, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे सतत पंधरा वर्षाच्या संशोधनानंतर खासकरून ओल्या काजूगरासाठी उपयुक्त काजूचे वाण वेंगुर्ला-१० एमबी या नावाने लागवडीसाठी शिफारस करण्यात आले आहे. सदर वाण निवड पध्दतीने विकसित करण्यात आले असून या वाणामध्ये टरफलामधील कमी तेल (CNSL), मध्यम टरफलाची जाडी व ओल्या काजू बीमधून गर काढण्यास सुलभ असल्यामुळे ओल्या काजूगरासाठी सदर वाण उपयुक्त आहे.
या वाणाच्या काजू बीमधून ओले काजूगर काढण्यास सुलभ असल्यामुळे काजूगर काढण्यासाठी कमी वेळ खर्च होतो. त्यामुळे इतर वाणांच्या तुलनेत कमी वेळेत जास्त काजूगर मिळतात. पर्यायाने मजुरीमध्ये बचत होते. तसेच या वाणामध्ये काजू बी टरफलामधील तेल इतर वाणांच्या तुलनेत कमी प्रमाणात असल्यामुळे हाताला कमी इजा होते. ओल्या काजू बीमधील ओल्या काजूगराचे प्रमाण (३२%) जास्त असल्यामुळे एकूण ओल्या काजूगराचे प्रति1 झाड उत्पादन वाढते. सदर वाण चालू वर्षात प्रसारीत झाल्यामुळे या वाणाची कलमे शेतकऱ्यांना नवीन वर्षापासून प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे उपलब्ध होणार आहेत.
वेंगुर्ला-१० एमवी वाणाची वैशिष्टये :
*ओल्या काजू बीमधून गर काढण्यास सुलभ.
*मध्यम टरफलाची जाडी.
*ओल्या काजू बी टरफलामधील कमी तेल (७.८७ %).
*ओल्या काजूगरासाठी उपयुक्त.
*ओल्या काजूगराचे अधिक प्रमाण.
*ओल्या काजूगराचे अधिक उत्पादन.
