दिल्लीमध्ये मध्यरात्री उशिरा भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत आगामी निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण संघटनात्मक चर्चा पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आगामी निवडणूक रणनीतीवर विस्तृत बैठक झाली होती. या चर्चेचा सारांश रविंद्र चव्हाण यांनी शाहांकडे सोपवला असून, पुढील निवडणूक नियोजनाबाबत प्राथमिक रूपरेषा या भेटीत चर्चिली गेल्याचे सूत्रांकडून समजते.

राज्यातील राजकीय वातावरण तापत असताना, चव्हाण आणि शाह यांची मध्यरात्री झालेली ही बैठक भाजपच्या आंतरिक तयारीला गती मिळाल्याचे द्योतक मानली जात आहे.