रेटिंग एजन्सी मूडीजचा ‘ग्लोबल मॅक्रो आऊटलूक 2026-27’ चा रिपोर्ट आला आहे. हा रिपोर्ट डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांची जागा दाखवून देणारा आहे. हा नवीन भारत काय करु शकतो ते ट्रम्प यांना कळलं असेल. या रिपोर्टमध्ये काय म्हटलय?.
जगभरातील अर्थव्यवस्था भले सुस्तावलेल्या असतील, पण भारताचा वेग कायम राहणार आहे. प्रसिद्ध रेटिंग एजन्सी मूडीजने आपला ‘ग्लोबल मॅक्रो आऊटलूक 2026-27’ चा रिपोर्ट जारी केला आहे. भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढची दोन वर्ष 2027 पर्यंत G-20 देशांच्या समूहात भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल. भारताचा विकास दर 6.5 टक्के राहिल असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. अमेरिकेचा 50 टक्के टॅरिफचा निर्णयही भारातच्या प्रगतीला रोखू शकणार नाही. भारताची ही मजबूती भक्कम आहे. मूडीजनुसार, देशात इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये होणारी गुंतवणूक, बाजारात ग्राहकांची मागणी आणि एक्सपोर्ट विविधता याला ताकद देतायत.
भारताने ट्रम्पना दाखवलं तु्म्ही आमचं काही बिघडवू शकत नाही, मूडीजचा रिपोर्ट आला GOOD NEWS