मुंबई : महाराष्ट्र सरकारने 2026 साली राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या असून भाऊबीज (११ नोव्हेंबर) या दिवशी अतिरिक्त सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.

या सुट्ट्या सर्व शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासन उपक्रमांना लागू राहणार आहेत. तसेच १ एप्रिल २०२६ हा दिवस बँकांच्या वार्षिक लेखापरीक्षणासाठी विशेष सुट्टी म्हणून घोषित करण्यात आला आहे.

मुख्य सुट्ट्या

  • २६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन
  • १९ फेब्रुवारी – शिवजयंती
  • ३ मार्च – होळी
  • १९ मार्च – गुढीपाडवा
  • २१ मार्च – रमझान ईद
  • ३ एप्रिल – गुड फ्रायडे
  • १ मे – महाराष्ट्र दिन
  • १५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन
  • १४ सप्टेंबर – गणेश चतुर्थी
  • २० ऑक्टोबर – दसरा
  • ८–१० नोव्हेंबर – दिवाळी
  • ११ नोव्हेंबर – भाऊबीज (अतिरिक्त सुट्टी)
  • २५ डिसेंबर – नाताळ