आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ अपेक्षित आहे. जागतिक सत्रात वाढ होत असताना मुख्यतः आशिया पॅसिफिक क्षेत्रातील बाजारात रॅली होण्याची दाट शक्यता आहे. सेन्सेक्स २० अंकाने व निफ्टी ९.२५ अंकांने वाढ झाली आहे. सेन्सेक्स बँक व बँक निफ्टीत सकारात्मक संकेत मिळत आहेत त्यामुळे बाजारात सपोर्ट लेवल मिळण्यास मदत होईल. निफ्टी व्यापक निर्देशांकात मिडकॅप ५० (०.३१%),स्मॉल कॅप १०० (०.१०%) वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ मेटल (०.६९%), रिअल्टी (१.०२%), मिड स्मॉल फायनांशियल सर्विसेस (०.४७%) निर्देशांकात झाली आहे.

गिफ्ट निफ्टीतही किरकोळ वाढ झाली आहे. युएस बाजारातील डाऊ जोन्स (०.०४%) वगळता इतर दोन्ही एस अँड पी ५०० (१.५५%), नासडाक (२.६८%) निर्देशांकात मोठी रॅली झाली आहे. एआय व माहिती तंत्रज्ञान शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या वाढीनंतर बाजारात एकूण रॅली झाली. दुसरीकडे युएस बाजारात व्याजदरात कपातीचे संकेत पुन्हा एकदा जागे झाल्याने बाजारात आज एकूणच सकारात्मकता कायम राहू शकते. किंबहुना भारतीय बाजारात एकूणच बाजारातील मजबूत फंडामेंटल व रूपयाची सुरू झालेली घौडदौड एकूणच समाधानकारक दुसरे तिमाही निकाल व स्मॉलकॅप शेअर्समध्ये रॅलीची आश्वासकता अशा विविध कारणांमुळे रॅली अपेक्षित आहे. सकाळच्या सत्रात आज आयटी शेअर्समध्ये विशेष लक्ष केंद्रित केले जाऊ शकते तसेच गुंतवणूकदारांचा बँक, मेटल, रिअल्टी शेअर्समध्ये असलेला कौल अखेरच्या सत्रातील अंतिम टप्पा ठरवण्यास कारणीभूत ठरू शकतो. एकूणच रूपयात सुधारणा व डॉलर मध्ये होत असलेल्या घसरणीचा फायदा परकीय गुंतवणूकदारांना रोख गुंतवणूक होऊ शकतो त्यामुळे रोख खरेदी काढण्यास एफआयआयला नवीन ट्रिगर नाही. त्यामुळेच बाजारात नव्या संधीची वाट गुंतवणूकदारांना पहावी लागेल असे एकंदरीत दिसत आहे.