नागपूर : बहुप्रतिक्षित वैभववाडी–कोल्हापूर रेल्वे प्रकल्प उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय निश्चित झाला असून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत याबाबत निवेदन दिले. खासदार नारायण राणे यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

मंत्री नितेश राणे यांच्या मते, हा रेल्वेमार्ग कोकण तसेच संपूर्ण महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरेल. यामुळे कृषी व मत्स्य उत्पादनांच्या वाहतुकीला गती मिळेल, पर्यटन वाढेल आणि पूर-भूस्खलनाच्या काळात पर्यायी दळणवळणाची सुविधा उपलब्ध होईल.