महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशन २०२५ दरम्यान भारतीय जनता पक्षाचे नेते व खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अॅड. वैभवजी खेडेकर यांनी आज महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार सन्माननीय रविंद्रजी चव्हाण यांची भेट घेतली.
या भेटीत खेड शहर व परिसरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. पायाभूत सुविधा, नागरी सुविधा, तसेच प्रलंबित प्रकल्पांना गती कशी देता येईल याबाबत सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
या भेटीत ज्येष्ठ नेते प्रकाशजी महाजन, माजी जिल्हाध्यक्ष संतोषजी नलावडे, तसेच स्वरूप माजलेकर, सर्वेश पवार आणि प्रदीप भोसले उपस्थित होते.
बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली असून, राज्य नेतृत्वाकडून स्थानिक विकास उपक्रमांना आवश्यक ते साहाय्य व सहकार्य मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
