जयवंत माडपे खोपोली : अखेर 34 तासानंतर एक्सप्रेस वे वरील बोर घाटातील वाहतूक पूर्ववत करण्यात प्रशासनाला यश आले आहे. या टँकर मधील रसायन घातक होते त्याचा परिणाम पाच किलोमीटर परिसरात होऊ शकला असतो त्यामुळे सर्व सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत काळजीपूर्वक परिस्थिती हाताळली आणि अखेर तो टँकर घटनास्थळावरून हलवण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे.
खंडाळा बोरघाटातील आडोशी कॉर्नरला परवा सायंकाळी हा रसायन टँकर पलटी झाला होता त्यामुळे सुरक्षेच्या कारणावरून काही दोन्ही लेनकडील वाहतूक बंद करण्यात आल्या होत्या त्यामुळे महामार्गावर दोन्हीकडे प्रचंड वाहतूक झाली होती अनेक जण तासान तास यामुळे या वाहतूक कोंडीत अडकले होते, या दरम्यान कुठेही प्रशासनातर्फे वाहन चालकांना पाणी देण्यात आले नसल्याचे सांगण्यात.आले वाहनांमधील लहान मुले ज्येष्ठ नागरिक यांचे यावेळी प्रचंड हाल झाले. यामुळे खंडाळा बोरघाटातील मिसिंगलींक हा नवीन रस्ता कधी तयार होणार याकडे अनेकदा अनेकांनी विचारणा केली. बोर घाटात अडकलेल्या प्रवाशांना कुठलीही खाण्यापिण्याची सोय नसल्याने खूपच हाल झाल्याचे दिसून आले. प्रशास्रातर्फे सुद्धा कुठल्याही प्रकारची प्रसार माध्यमांना याबाबत अधिकृत माहिती दिली जात नव्हती. सदरचा टँकर केव्हा हटवणार कधी वाहतूक सुरू होणार अशी सातत्याने प्रवाशांकडून विचारला होत होती.
ट्रक चालक बस चालकांनी तर रस्त्यावरच झोपण्याची व्यवस्था केली होती कारण टासन तास वाहतूक हलणार नव्हती तो केव्हा हलणार याचाही अधिकृत कोणालाच काही माहिती मिळत नव्हती. रायगडच्या पोलिस अधीक्षक श्रीमती आचल त्याचप्रमाणे खालापूर पोलीस उपविभागीय अधिकारी नेहूल हे रात्रीपासूनच घटनास्थळी दाखल होत परिस्थितीची माहिती घेत होते. त्याचप्रमाणे खालापूरचे तहसीलदार चव्हाण घटनास्थळी होते. शासनाचे ndrf खोपोलीची हेल्प फाउंडेशन, व इतर शासकीय यंत्रणा, खालापूर व खोपोली पोलीस यंत्रणा गेली 34 तास डोळ्यात तेल घालून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.. अखेर अन्य टँकर मध्ये ते रसायन पलटी करण्यात आल्यानंतर रिकामा टँकर हलविण्यात आला या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करून परिस्थिती चिगलू नये म्हणून अत्यंत काळजीपूर्वक परिस्थिती हाताळण्यात येत होती. अनेकदा या महामार्गावर अपघात झाले परंतु इतका वेळ महामार्ग बंद होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही प्रवाशांकडून सांगण्यात आले.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
