चिपळूण: शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये उद्या शनिवार दि.३१ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय जनता, व्यापारी, सर्व क्षेत्रातील नागरिक यांची शोकसभा आयोजित करण्यात आली आहे,अशी माहिती आमदार शेखर निकम यांच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजितदादा पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाले आणि अवघा महाराष्ट्र हळहळला. त्यांचे चाहते आणि पक्षाचे कार्यकर्ते अक्षरश: शोकसागरात बुडाले असून “दादा परत या” असा कार्यकर्त्यांचा आर्त आक्रोश सगळीकडे पाहायला मिळतोय. चिपळूणच्या वाशिष्टी नदीमधील गाळ काढण्यासाठी अजितदादांनी आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. या निधीतून गाळ काढला जात असून त्यामुळे दरवर्षी निर्माण होणारी पूर समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. चिपळूणवर अजितदादांचे नेहमीच प्रेम आणि स्नेह राहिला आहे. आज अजितदादानी अचानक एक्झिट घेतली. त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी चिपळूणमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी व उदय ओतारी यांनी कळविले.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY