महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने शाश्वत विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलली आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने शेती, सिंचन, पायाभूत सुविधा, उद्योग, रोजगार, सामाजिक न्याय आणि सुरक्षा यासह प्रत्येक क्षेत्रात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. विशेषतः अतिवृष्टी, दुष्काळ आणि पीककर्जांसाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. पशुपालन आणि मत्स्यव्यवसायाला कृषी दर्जा देण्यात आला, जलसिंचन प्रकल्पांना मोठ्या निधीची तरतूद झाली, आणि जलयुक्त शिवार 2.0 अंतर्गत हजारो कामे पूर्ण झाली आहेत.
पायाभूत सुविधांमध्ये समृद्धी महामार्ग पूर्ण, शक्तीपीठ महामार्ग, नवीन बंदर, मेट्रो योजना, नागपूर राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था आणि रेल्वे सेवा सुधारण्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाडकी बहिण योजना, महिला बचत गटांसाठी उमेद मॉल सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. उद्योग क्षेत्रासाठी नवीन औद्योगिक, इलेक्ट्रॉनिक्स, जेम्स अँड ज्वेलरी धोरणे जाहीर झाली आहेत.
विदेशी गुंतवणूक आणि विकासाच्या बाबतीतही महाराष्ट्र आघाडीवर आहे. 2024-25 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 34% अधिक गुंतवणूक झाली आहे. सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी स्मारक, तीर्थक्षेत्र विकास, ऐतिहासिक वंशपरंपरेची जपणूक यावरही भर दिला आहे.
सरकारी सेवांमध्ये सुधारणा, वीजदरात कपात, प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत लाखो घरे पूर्ण, ग्रामीण भागात नळजोडणी, आणि डिजिटल सेवांमुळे पारदर्शकता वाढवणे या सर्व क्षेत्रांत महायुती सरकार कार्यरत आहे.
एक वर्षातील कामगिरीतून स्पष्ट होते की महाराष्ट्र शाश्वत विकासाच्या मार्गावर दमदार पावले टाकत आहे
महायुती सरकारमुळे महाराष्ट्राची वेगाने प्रगती :ना.बावनकुळे
