मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात एका काँक्रीटच्या भिंतीलगत एका पुरूषाचे प्रेत सापडल्यानंतर त्याच्या मारेकरी प्रेयसी आणि तिच्या साथीदाराचा यशस्वीरित्या शोध घेणाऱ्या पोलादपूर पोलीसांसमोर पुन्हा अशाच एका काँक्रीटच्या भिंतीच्या मोरीच्या पाईपामध्ये महिलेचे जळलेले प्रेत आढळल्याने आव्हान उभे ठाकले आहे. महिलेच्या खुनानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी जाळले असण्याची शक्यता पोलीसांकडून वर्तविण्यात आली असून आंबेनळी घाटात ‘हत्याकांड’ झाल्याच्या या बुधवारच्या घटनेनंतर पोलादपूरकर हादरल्याचे दिसून आले.

आंबेनळी घाटात पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत बावलीटोकच्या खालील बाजूला आणि चिरेखिंड गावाच्या वरील मुख्य घाटरस्त्यालगत अज्ञात महिलेचा जळालेला मृतदेह काँक्रीटच्या भिंतीच्या मोरीच्या पाईपामध्ये असल्याचे या परिसरामध्ये दूर्गंधी पसरल्याने शोध घेता आंबेनळी घाटातील रस्त्याचे काम करणाऱ्या कामगारांना आढळून आले. या घटनेची फिर्याद रस्त्याच्या कामाचा साईट सुपरवायझर अजित नथुनसाहा गुप्ता (वय 27 वर्षे, सध्या रा.कापडे बुद्रुक, ता.पोलादपूर, जि.रायगड मूळ रा.सुकरवलिया, ता.इटाठी, जि.बकसर, बिहार) याने पोलादपूर पोलीसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व महिला पोलीसांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून परिसराची पाहणी केली असता अज्ञात आरोपीने अज्ञात महिलेला अज्ञात कारणाने जीवे ठार मारून पोलादपूर तालुक्यातील बावळीटोक गावाच्या हद्दीतील काँक्रीटच्या भिंतीमधील मोरीच्या पाईपामध्ये कोणतेतरी अतिज्वलनशील रसायनाने आग निर्माण करून तिचे प्रेत नष्ट करून तिची ओळख तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH