चिपळूण (विशेष प्रतिनिधी): निकम कुटुंबीयांशी विशेष स्नेह असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाच्या वृत्तामुळे अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून ही दुःखद वार्ता कळताच आमदार शेखर निकम भावुक झाले आणि ते तातडीने बारामतीकडे रवाना झाले. तर माजी सभापती पूजाताई निकम यांना अश्रू आवरणे कठीण झाले. सागर wave शी बोलताना पूजाताई अक्षरशः ढसाढसा रडल्या. सावर्डे येथील कार्यालयात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली असून ही बातमी कळताच सकाळीच आमदार निकम बारामतीकडे रवाना झाले. दैनिक सागरशी बोलताना आमदार निकम म्हणाले की राजकारणापलीकडे आमचे संबंध होते. माझा आधारवड गेला. अधिक काय बोलू.. अशा शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली.
▶ सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤 सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
