जळगाव:- स्व.अजित दादांच्या मृत्यूचं गूढ समोर आणण्यासाठी सर्व पक्षीय आमदारांनी अधिवेशनात जाब विचारावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केली आहे.

याबाबत सविस्तरपणे त्या म्हणाल्या की,

महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. मला आशा आहे की या अधिवेशनात

  • राज्यातील महिला-मुली बेपत्ता होण्याच्या प्रमाणांवर चर्चा होऊन या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस निर्णय होईल
  • भारत आणि अमेरिकेत जो व्यापार करार झाला आहे. त्याबाबत सरकार उत्तर देईल आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संरक्षण देईल
  • भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदारामुळे पडणारे पूल, खचणारे रस्ता यावर काही तरी ठोस उपाययोजना होईल तसेच भ्रष्टाचाऱ्यांना चाप बसवली जाईल
  • राज्यातील बंद पडणाऱ्या मराठी शाळा, कोसळलेली आरोग्य यंत्रणा, बेरोजगारी, परराज्यात जाणारे उद्योगधंदे यावर उत्तर मिळेल
  • आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे लाडके उपमुख्यमंत्री स्व. अजित दादा पवार यांच्या मृत्यूचे गूढ उकलेल तसे ना झाल्यास आमचे रोहित दादा पवार तर पाठपुरावा तर करतच आहे पण सर्व पक्षीय आमदार देखील याबाबत सरकारला सभागृहात जाब विचारेल

ही अपेक्षा