रत्नागिरी (प्रतिनिधी): प्रगतिशील आणि समरस समाज घडविण्याचे कार्य करणाऱ्या अनुलोम परिवारातील रत्नागिरी सिंधुदुर्ग उपविभागाच्या जनसेविका तनयाताई शिवलकर आणि कुडाळ भाग जनसेवक बाजीराव काळे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच गौरव करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येवला, नाशिक येथे अनुगामी लोकराज्य अभियान यांच्या वतीने आयोजित कापसे फाऊंडेशन येथे ‘अनुलोम संगम-2026’ कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमादरम्यान पद्मश्री श्रीरंग लाड, कापसे पैठणी उद्योग समूहाचे संस्थापक बाळकृष्ण कापसे तसेच अनुलोमच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कोकण विभागातील
भिवंडी उपविभागतील मुरबाड भाग जनसेवक दिनेश भावार्थे, भिवंडी पश्चिम भाग जनसेवक राजेश पाठारे, कुडाळ भाग जनसेवक बाजीराव काळे तसेच भिवंडी उपविभाग जनसेवक प्रकाश लसणे व रत्नागिरी सिंधुदुर्ग उपविभाग जनसेविका तनयाताई शिवलकर या जनसेवकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच संपूर्ण महाराष्ट्रात सांघिक उत्तम कामगिरी (टीम वर्क) म्हणून कोकण विभागातील भिवंडी उपविभागातील सर्व जनसेवक यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अनुलोम प्रांतप्रमुख स्वानंद ओक, सहप्रमुख सुजाता मराठे, मुख्यमंत्री यांनी ओसडी अतुलजी वझे,कोकण विभाग पालक प्रेरणा पवार, कोकण विभाग प्रमुख रवींद्र भोवड व महाराष्ट्रातील सर्व जनसेवक व संवादिनी उपस्थित होते.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
