मंडणगड ( प्रतिनिधी ) : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने बाणकोट सागरी पोलीस ठाणे,वेसवी यांच्यावतीने 5 फेब्रुवारी 2026 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रूट मार्चचे आयोजन करण्यात आले.

सदर रूट मार्च पोलीस अधीक्षक नितीन बगाटे तसेच अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली बाणकोट सागरी पोलीस ठाणे, वेसवीचे स.पो.नि. संजय चव्हाण यानी पार पडले. यावेळी अंमलदार,पोलीस कर्मचारी, आणि होमगार्ड दलाच्या जवानांचा सहभाग होता. या रूट मार्चच्या माध्यमातून बाणकोट सागरी पोलीस ठाणे, वेसवी यांची ठोस उपस्थिती अधोरेखित करण्यात आली असून समाजकंटक व कायदा भंग करणाऱ्यांना कडक संदेश देण्यात आला. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी बाणकोट पोलीस पूर्णतः सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश या रूट मार्चद्वारे देण्यात आला.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY