नागोठणे (धम्मशील सावंत ):रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे रायगड जिल्हा परिषद नागोठणे गटाचे उमेदवार सुमित काते व पंचायत समिती चे उमेदवार अंजली दुर्गावले व अरुणा हंबीर यांच्या प्रचारासाठी भव्य सभा नागोठणे येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळेस आगामी निवडणुकीतील ही विजयाची नांदी असल्याचा ठाम विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला. या सभेत प्रचंड जनसमर्थन दिसून आल्याने आमचे सर्व उमेदवार निश्चितपणे विजयी होतील, असा दावा त्यांनी केला.
रायगड जिल्ह्यातील शिंदे शिवसेनेने आता रायगड जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केलीय, रायगड जिल्हा परिषदेवर निर्विवाद भगवा फडकविण्याचा शिवसेनेने निर्धार केलाय. नागोठण्यात शिंदे शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस, आरपीआय, राष्ट्रवादी (शरद पवार)पक्षाची मजबूत साथ मिळालीय. सुमित काते यांना बहूमताने निवडून आणण्यासाठी पाच राजकीय पक्ष एकत्र आले असल्याने विरोधकांना धडकी भरलीय. या भक्कम व अभेदय एकजुटीने
सुमित काते व अन्य उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे चित्र निर्माण झालेय. मंत्री भरत गोगावले, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर व काँग्रेस, आरपीआय, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रमुख नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत नागोठणे येथे भव्य सभा पार पडली. यावेळी परिवर्तन विकास आघाडीतीतील नेत्यांनी जोशपूर्ण व विकासाचं व्हिजन मांडणारी भाषण केली.
यावेळी पत्रकारांसोबत बोलताना मंत्री गोगावले यांनी भाजप शिवसेनेची युती होऊ शकली नाही यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्यांची खरी इच्छा आमच्याकडे येण्याची नव्हतीच, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कडे जायचे होते. त्यामुळेच कदाचित त्यांनी आमच्याशी युती केली नसावी,”
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
