चिपळूण: भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी रत्नागिरी दक्षिण कार्यकारिणीची घोषणा केली असून त्यामध्ये विविध मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांचीही नियुक्ती केली आहे. भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्षपदी चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष लियाकत शहा यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
श्री. प्रशांत यादव यांनी जाहीर केलेली जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – उपाध्यक्ष : प्रमोद श्रीधर अधटराव (आंबव, संगमेश्वर), संदीप हनुमंत सुर्वे (नाचणे, रत्नागिरी), संगिता सुखदेव जाधव, (साडवली, संगमेश्वर), बळीराम जयराम मोरे (कापरे, चिपळूण), स्नेहा सुनिल मेस्त्री (खेर्डी, चिपळूण), चंद्रकांत महादेव मांडवकर (वेरवली खु., लांजा), भास्कर सिताराम सुतार (पाचल, राजापूर), विकास मनोहर सावंत (रत्नागिरी), सुहास ऊर्फ राजू विलास भाटलेकर (रत्नागिरी), शितल सुनिल पटेल (राजापूर), सरचिटणीस : ओंकार पांडुरंग फडके (नाचणे, रत्नागिरी), स्वानंद सुभाष रानडे (चिपळूण), अभिजीत यशवंत गुरव (कोदवली, राजापूर), सुप्रिया संतोष उतेकर (खेर्डी, चिपळूण), सरचिटणीस : राजन विष्णू पटवर्धन (नाचणे, रत्नागिरी), निलेश विठोबा भुरवणे (देवरुख, संगमेश्वर), योगेश चंद्रकांत शिर्के (चिवेली, चिपळूण), मनोज विनायक पाटणकर (रत्नागिरी), सौ. नयना उदय पवार (सती, चिपळूण), अनिल अशोक सावर्डेकर (चिपळूण), समीर सुधाकर टाकळे (चिपळूण), समिरा संतोष सुर्वे (लांजा दक्षिण), अपेक्षा राजदीप दाभोळकर (लांजा उत्तर), अभिनव प्रकाश भुरण (खेर्डी, चिपळूण), तर कोषाध्यक्ष पदावर मकरंद ऊर्फ आशिष खातू (चिपळूण) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच जिल्हा सदस्य म्हणून शेखर लेले (रत्नागिरी), मोहन पटवर्धन (रत्नागिरी), चंद्रशेखर पटवर्धन (रत्नागिरी), सदानंद राजवाडे (देवरुख), प्रणव वाकणकर (संगमेश्वर), शिरूरशेठ कबनूरकर (साखरपा), सुरेश गांधी (साखरपा), महेश सुर्वे (रत्नागिरी), उदय माने (जयगड, रत्नागिरी), चंद्रशेखर निमकर (रत्नागिरी), प्रसाद ऊर्फ बापू सदानंद गवाणकर (रत्नागिरी), ऋषिकेश चंद्रशेखर केळकर (रत्नागिरी), संतोष बोरकर (रत्नागिरी), सुभाष बाबाराम नलावडे (संगमेश्वर), राकेश तुकाराम जाधव (संगमेश्वर), सुधीर यशवंतराव (संगमेश्वर), श्रीकृष्ण ऊर्फ बब्या हेगिष्ट्ये (लांजा), चंद्रकांत खामकर (लांजा), भागोजी खानविलकर (लांजा), अशोक पाटोळे (लांजा), विजय वसंत चितळे (चिपळूण), सुनील प्रभाकर वाजे (मालघर, चिपळूण), सुनील हरिश्चंद्र देवरुखकर (पिंपळी, चिपळूण), शशिकांत सुधाकर साळवी (कोंढे, चिपळूण), दीपक हनुमंत महाडिक (खांदाटपाली, चिपळूण), अनिल मारुती चिले (पाचाड, चिपळूण), विनोद सुर्वे (अलोरे, चिपळूण), राजेंद्र ऊर्फ बाबू सुतार (पोफळी, चिपळूण) यांची निवड करण्यात आली आहे. तसेच महिलांनाही जिल्हा सदस्य म्हणून स्थान देण्यात आले असून यात सदस्य म्हणून सत्यवती सत्यवान बोरकर (रत्नागिरी), वासंती अनिल दाभोळे (चिपळूण), शिल्पा संतोष शिंदे (कादवड, चिपळूण), माधुरी मानसिंगराव शिंदे (चिपळूण), माधवी संतोष शिंदे (ओवळी, चिपळूण), विभावरी रविकिरण जाधव (खेर्डी, चिपळूण), शितल राजाराम पंडित (देवरुख), दिपिका राजाराम जोशी (रत्नागिरी), सिमा श्रीकांत रानडे (चिपळूण), स्वाती राजेंद्र देवळेकर (चिपळूण), शारदा गुरव (लांजा), अश्विनी वरवडेकर (चिपळूण) यांचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार मा. नारायणराव राणे साहेब, महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री ना. नितेशजी राणे साहेब यांच्यासह ज्ञानेश्वरजी म्हात्रे (आमदार), निरंजनजी डावखरे (आमदार), अतुलजी काळसेकर (प्रदेश उपाध्यक्ष), डॉ. विनयजी नातू (माजी आमदार), प्रमोदजी जठार (माजी आमदार), अनिकेतजी पटवर्धन (माजी युवा जिल्हाध्यक्ष) यांच्यासह महेश जाधव, शैलेंद्र दळवी, श्रीमती शिल्पाताई मराठे, सचिन श्रीकांत वहाळकर (रत्नागिरी), दीपक पटवर्धन (रत्नागिरी), दत्ता देसाई (रत्नागिरी), शिल्पा पटवर्धन (रत्नागिरी), अॅड. विलास पाटणे (रत्नागिरी), अॅड. बाबासाहेब परुळेकर (रत्नागिरी), मुन्नाशेठ सुर्वे (रत्नागिरी), प्रा. दत्तात्रय ऊर्फ नाना शिंदे (रत्नागिरी), सतीश मधुसूदन शेवडे (रत्नागिरी), सौ. स्वप्ना प्रशांत यादव (चिपळूण), प्रणाली अभिजित सावर्डेकर (चिपळूण), रामदार जिवाजी राणे (चिपळूण), मंगेश ऊर्फ बाबू श्रीकृष्ण तांबे (चिपळूण), विष्णू लक्ष्मणराव कदम (चिपळूण), निलेश आत्माराम भुरण (खेर्डी, चिपळूण), रश्मी राजेंद्र कदम (संगमेश्वर), निलेश आत्माराम लाड (रत्नागिरी), ऐश्वर्या जठार (रत्नागिरी), विजयराव देसाई (खेर्डी, चिपळूण), अभय वसंत चितळे (चिपळूण), अनिल राजाराम चव्हाण (येगाव, चिपळूण) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे श्री. प्रशांत यादव यांनी अभिनंदन केले असून जिल्ह्यातून या पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात भाजपला नक्कीच बळकटी येईल, असा विश्वास यावेळी श्री. यादव यांनी व्यक्त केला.
नवनिर्वाचित मोर्चा अध्यक्ष
श्री. प्रशांत यादव यांनी विविध मोर्चांच्या अध्यक्षांचीही नियुक्ती जाहीर केली. यात महिला मोर्चा अध्यक्षपदी सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांची तर युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी राहुल नेताजी पवार यांची, किसान मोर्चा जिल्हाध्यक्षपदी अजित रामचंद्र निकम यांची, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्षपदी अभिजित चंद्रकांत शेट्ये यांची तर अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्षपदी लियाकत सत्तार शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
