ठाणे ( प्रतिनिधी)-कल्याण डोंबिवलीमध्ये आमचे ५३ नगरसेवक निवडून आले. हे सर्व नगरसेवक गट स्थापन करण्यासाठी कोकण भवनात  आले आहेत.तसेच मनसेचे पाच नगरसेवकही गट स्थापन करण्यासाठी आले आहेत.आम्ही युतीमध्येच सत्ता स्थापन करणार आहोत.जेवढे लोक सोबत येतील, त्यांना सोबत घेऊन जाऊ.मनसेने महायुतीला समर्थन दिलेले आहे.

हे सगळे अधिकार शिंदे साहेबांचे आहेत.कोण महापौर होणार, हे शिंदे साहेब आणि वरिष्ठ नेते ठरवतील. असा स्पष्ट खुलासा शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नवी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला. कल्याण मधील ठाकरे सेनेचे ते चार नगरसेवक कुठेतरी फिरायला गेले असावेत असे सांगूनआम्ही भाजपला कुठेही बाजूला ठेवत नाही.शिवसेना, भाजप आणि मनसे मिळून सत्ता स्थापन करणार.मनसे महायुतीमध्ये आल्याने ताकद वाढणार आहे.महायुती जिथे एकत्र लढली, तिथे आम्ही एकत्र सत्ता स्थापन करू असे त्यांनी स्पष्ट केले.मुंबई महानगरपालिकेवर

शिवसेनेचा महापौर बसला तर कोणाला आवडणार नाही?

आम्हालाही ते नक्कीच आवडेल अशी टिप्पणी त्यांनी केली. संजय राऊत यांच्या विधानांवर लक्ष देण्याची गरज नाही असे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तरावर स्पष्टपणे नमूद केले.


▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY