रायगड (मनोज खांबे) : संपूर्ण राज्यात आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू असून महाड तालुक्यात सकाळपासूनच शांततेत आणि उत्साहात मतदान होत आहे. याच दरम्यान महाड तालुक्यातील चांढवे खुर्द गावात एक प्रेरणादायी घटना घडली आहे.
चांढवे खुर्द येथील विशाल उतेकर यांचा आज विवाह सोहळा होता. मात्र “लगीन आधी, लोकशाहीचे कर्तव्य आधी” या विचाराने नवरदेव विशाल उतेकर यांनी बोहल्यावर चढण्याआधी थेट आपल्या गावातील मतदान केंद्र गाठत मतदानाचा हक्क बजावला.
लग्नाच्या गडबडीतही मतदानाला प्राधान्य देत विशाल उतेकर यांनी लोकशाहीप्रती असलेली आपली जबाबदारी अधोरेखित केली. याबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, “तरुणांमध्ये मतदानाबाबत जनजागृती व्हावी, तसेच मतदानाचे महत्त्व आणि गांभीर्य तरुणांना समजावे यासाठी मी लग्नाआधी मतदानाचा हक्क बजावला.”
नवरदेवाच्या या कृतीचे गावकऱ्यांकडून तसेच मतदारांकडून कौतुक होत असून, ही घटना तरुण पिढीसाठी एक सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश देणारी ठरली आहे.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY