लोटे :- कॅनरा रोबेको ॲसेट मॅनेजमेंट कंपनी मर्यादित ने सीएसआर फंडातून एक उल्लेखनीय उपक्रम राबवला असून त्याअंतर्गत खेड तालुक्यातील गुणदे येथील सद्गुरु काडसिद्धेश्वर विद्यालय गुणदे येथील सातवी ते दहावीच्या २६० विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप केले आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील ९० सायकलींचे वाटप नुकतेच सद्गुरुष काढसिद्धेश्वर विद्यालय, गुणदे च्या मैदानावर करण्यात आले.
कॅनरा रोबेको ॲसेट मॅनेजमेंट कंपनी मर्यादित ही कंपनी गुंतवणूक क्षेत्रात काम करणारी कंपनी असून यांच्या माध्यमातून सी.एस.आर. फंडातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबवले जातात. चालू आर्थिक वर्षात देशभरातील जिल्हा परिषद आणि नगरपालिका शाळांमधील इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सुमारे सहा हजार सायकलींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ आमच्या गावातील विद्यार्थ्यांनाही मिळावा अशी विनंती गुणदेचे सरपंच श्री रवींद्र आंब्रे यांनी कॅनरा रोबेको कंपनीच्या फायनान्स असिस्टंट मॅनेजर श्री हर्षल अनंतराव आंब्रे यांना केली. श्री. हर्षल आंब्रे यांचे वडील श्री अनंतराव आंब्रे हे सद्गुरु काडसिद्धेश्वर विद्यालय गुणदे चे माजी विद्यार्थी आहेत. आणि म्हणूनच माझ्या नाही तर माझ्या वडिलांच्या शाळेला काहीतरी माझ्या माध्यमातून मदत होत असेल तर हे माझ्यासाठी भाग्यच आहे असे समजून श्री हर्षल आंब्रे यांनी या शाळेतील सातवी ते दहावीच्या सर्वच्या सर्व म्हणजे २६० विद्यार्थ्यांना सायकली मिळवून दिल्या. यातील पहिल्या टप्प्यामधील ९० सायकलींचे वितरण नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी कॅनरा रोबेको ॲसेट मॅनेजमेंट कंपनी मर्यादित चे असिस्टंट मॅनेजर फायनान्स श्री हर्षल अनंतराव आंब्रे हे आपल्या मातापित्यांसहित उपस्थित होते. याचवेळी घरडा केमिकल्स लिमिटेड च्या सीएसआर फंडातून देण्यात आलेल्या डिजिटल इंटरॲक्टिव बोर्डांचे उद्घाटन करण्यात आले. घरडा केमिकल्स लिमिटेड चे सीएसआर हेड श्री बापूसाहेब पवार यांच्या हस्ते या डिजिटल इंटरॲक्टिव बोर्डांचे उद्घाटन स्विच ऑन करून करण्यात आले आणि ते विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री विक्रांत दत्ताजीराव आंब्रे, संचालक सुनील मोरे, प्रकाश आंब्रे, संजय दत्ताजीराव आंब्रे, विष्णु आंब्रे, दिपक श्रीपतराव आंब्रे, भास्कर आंब्रे,अशोक आंब्रे, सरपंच श्री रवींद्र आंब्रे, उपसरपंच सौ. रुणाली राजेंद्र आंब्रे, अनुदत्त जनसेवा प्रतिष्ठानचे कु. सागर संजय आंब्रे, अभिषेक यशवंत आंब्रे, शिवाजी रघुनाथ सावंत,जगन्नाथ आंब्रे,सखाराम गोरे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत आत्माराम आंब्रे, रत्नाकर कारेते,विद्यालयाचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,ग्रामस्थ आणि पालक उपस्थित होते.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
