िपळूण (सुनील साळवी): फन ऐन फेअरवरून परतलेल्या एका १९ वर्षीय युवतीवर अत्याचार झाल्याच्या अफवेमुळे गेल्या दोन दिवसांपासून चिपळुणात उलट सुलट चर्चा होत आहेत. या संदर्भात पोलिसांनी ताबडतोब खोलवर तपास केला असून त्या तरुणीवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार झालेला नसून तिचा पोलिसांनी रीतसर जबाबही नोंदवून घेतला आहे.
चिपळूण पोलीस सूत्रांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, ही युवती आपल्या मित्रांबरोबर मद्यपान करीत होती तेव्हा आपल्या मित्रांनीच आपल्यावर अत्याचार केला असावा अशी तिच्या मनात शंका निर्माण झाली. 112 नंबर वर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फोन करून यासंदर्भात पोलीस ठाण्याला कळविले होते. ही माहिती मिळाल्यानंतर कर्तव्यतत्पर पोलीस निरीक्षक मेंगडेसाहेब यांनी ताबडतोब सूत्र हलविली आणि त्या मुलीच्या घरी जाऊन तिला धीर दिला.यावेळी सोबत महिला कॉन्स्टेबलही होत्या. तिच्यासोबत असलेल्या मुलांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणी केल्यावर संबंधित युवतीवर कोणत्या प्रकारचा लैंगिक अत्याचार झालेला नसल्याचा अधिकृत रिपोर्ट डॉक्टरांनी पोलिसांना दिला. असा रिपोर्ट मिळाल्यानंतर पोलिसांनी या मुलीचा आणि तिच्यासोबत असलेल्या मित्रांचा जबाब नोंदवून घेतला. या मुलीने सांगितले की माझी कोणतीही तक्रार नाही. शिवाय तिच्यावर लैंगिक अत्याचार झालेला नसल्याचे वैद्यकीय तपासणी स्पष्ट झाले. कालांतराने हा सारा प्रकार गैरसमजतीतून घडला असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. शिवाय ही मुलगी आणि तिचे मित्र हे अधून मधून मद्यपान करीत असल्याचे माहिती प्राप्त झाली. ही युवती चिपळूणमध्येच राहणारी असून तिची आई मुंबईला राहते तर चिपळूणमध्ये ही मुलगी तिच्या आत्या सोबत राहते तर तिचे मित्र वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात तर काही मित्र लोट्यातील कंपनीत काम करतात.
पोलीस तपासात ती संपूर्ण माहिती हाती लागल्यामुळे हे प्रकरण नेमके काय आहे त्याचा उलगडा झाला. मात्र गेल्या दोन दिवसांपासून चिपळूणमध्ये या प्रकरणाची उलट सुलट चर्चा रंगली आहे. एका तरुणीवर अत्याचार झाला असून अत्याचार करून तिला शेतात टाकून देण्यात आले अशी चर्चा ऐकायला मिळत होती तथापि पोलिसांनी योग्य तपास करून लैंगिक अत्याचाराचा हा प्रकारच नसल्याचे स्पष्ट केले.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY