चिपळूण : चिपळूण नगर परिषदेत आज सकाळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून भारताचा ७७वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, मुख्याधिकारी संजय जाधव यांच्यासह सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेसहा वाजता बहादुरशेख नाका येथीलमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नगराध्यक्ष उमेशसकपाळ यांनी अभिवादन करून केली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली त्यानंतर
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राशेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. येथेही फटाक्यांच्या आतषबाजीत वातावरण देशभक्तीमय झाले.
ध्वजारोहण व जल्लोष
नगर परिषद आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नगराध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. त्यानंतर जिलेबी वाटप करून प्रजासत्ताक दिनाचा आनंद साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला उपमुख्याधिकारी मंगेश पेढांबकर, पाणीपुरवठा समितीचे सभापती निहार कोवळे, बांधकाम सभापती कपिल शिर्के, आरोग्य सभापती शुभम पिसे, शिक्षण सभापती हर्षाली पवार, सौ. आरती सकपाळ व सकपाळ कुटुंबीय, सर्व विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन बापू साडविलकर यांनी केले.

▶ सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY