चिपळूण : पेठमाप, गोवळकोट येथील श्री देवी करंजेश्वरी व श्री देव सोमेश्वर यांचा शिमगा महोत्सव उत्साही वातावरणात नुकताच पार पडला. या महोत्सवात शेरणे काढण्याचा महत्वाचा कार्यक्रम पेठमाप येथील नदीकाठच्या सीमेवर होत असतो. तेव्हा भरणार्या हजारो लोकांच्या यात्रेमुळे या परीसरात कागद, प्लॅस्टीक, प्लॅस्टीकच्या बाटल्या, चमचे, डीश,आईस्क्रीमचे कप, तुटके‌ चप्पलस् असा विविध स्वरुपाचा कचरा निर्माण होतो.पूज्य गांधी प्रतिष्ठानच्या वतीने गुरूवार दिनांक ५/३/२६ रोजी सकाळी स्वच्छता मोहीम घेऊन हा सर्व कचरा हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. या बद्दल ग्रामस्थांच्या वतीने समाधान व्यक्त करुन प्रतिष्ठानला धन्यवाद देण्यात येत आहेत.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विनायक होमकळस, सचिव श्री. सुनील‌ खेडेकर, माजी नगराध्यक्षा सौ. सावित्री होमकळस, प्रतिष्ठानचे कार्यकारिणी सदस्य श्री. दीपक महाडिक, अंतर्गत हिशेब तपासणी श्री. दीपक कदम, सदस्य सौ. सुनीता महाडिक, एडव्होकेट श्री. आशय होमकळस, सौ. अमृता होमकळस, सौ. हेमा होमकळस, श्री. प्रशांत सातारकर, सौ. छाया सातारकर, करंजेश्वरी देवस्थानचे विश्वस्त श्री. अजित पावसकर, माजी नगरसेवक श्री. मनोज शिंदे यांनी या स्वच्छता मोहिमेत भाग घेऊन दोन तास श्रमदान केले.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH