चिपळूण (विशेष प्रतिनिधी): चिपळूणच्या वाशिष्टी नदीला अचानक निळे ,हिरवे आणि सफेद रंगाचे पाणी वाहू लागल्यामुळे जनतेत एकच घबराट निर्माण झाली. हा प्रकार आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आला.

शहरातील पेठमाप येथील जुन्या फरशी पुलाजवळ रंगीत पाणी वाहू लागल्यामुळे जनतेत कुतूहल आणि घबराट निर्माण झाली होती. या प्रकाराची माहिती स्थानिक नगरसेवक प्रमोद बुरटे यांनी ताबडतोब नगर परिषदेचे उमदे पाणीपुरवठा सभापती निहार कोवळे यांना कळविले. माहिती कळतच कोवळे ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नगरसेवक बुरटे आणि विकी लवेकर आणि काही ग्रामस्थही उपस्थित होते.

या संदर्भात सभापती कोवळे यांनी खुलासा करताना सांगितले की,फरशी पुलाजवळ पंप हाऊस आहे आणि या पंप हाऊसच्या इमारतीला सध्या रंगकाम करण्याचे काम सुरू आहे. तेव्हा तेथील कामगारांनी रंगाचे डबे पाण्यात धुतले आणि त्यामुळे नदीमधील पाण्याचा रंग अचानक निळा,हिरवा,सफेद झाला. ही जाणून घेतल्यानंतर आम्ही ताबडतोब एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती कळवली तसेच पाण्याचे नमुने घेतले असून हे नमुने प्रदूषण मंडळाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये असे आवाहन कोवळे यांनी केले आहे.तसेच नगरपालिकेकडून संबंधित कामगारांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY