चिपळूण (विशेष प्रतिनिधी): जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भाजप-सेना युतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा चिपळूणमध्ये २८ जानेवारी रोजी होत असल्याचे वृत्त आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौरा स्थानिक प्रशासनाला प्राप्त झालेला नाही.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान आणि ७ फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. सर्वच ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रचार टिपेला पोहोचला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप युतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची चिपळूणमध्ये सभा होत आहे. ही सभा बहादूरशेख येथील सावरकर मैदानावर २८ रोजी दुपारी दोन वाजता घेण्यात येणार असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले. मुख्यमंत्री कोकणात तीन सभा घेणार असल्याचेही समजते. एकाच दिवशी सकाळी सिंधुदुर्गमध्ये, दुपारी चिपळूणमध्ये आणि दुपारी साडेतीन वाजता रायगडमध्ये सभा घेणार असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आम्ही तयारीत आहोत मात्र अधिकृत दौरा प्राप्त झालेला नाही असे सांगण्यात आले. तसेच स्थानिक प्रशासनालाकडेही मुख्यमंत्र्यांचा दौरा आलेला नाही. चिपळूणमधील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी केली असून आज प्रजासत्ताक दिनी भाजप पदाधिकाऱ्यांनी एका हॉटेलच्या सभागृहात नियोजनाची बैठक घेतली होती. चिपळूणला मुख्यमंत्री येणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह असून आता मुख्यमंत्र्याच्या अधिकृत दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
▶ सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
