चिपळूण (विशेष प्रतिनिधी): चिपळूण नगरपालिकेच्या सहा विषय समित्यांच्या सभापतींचा पदग्रहण सोहळा भाजपचे ज्येष्ठ नेते प्रशांत यादव, नगराध्यक्ष उमेश सकपाळ,गटनेते शशिकांत मोदी अंकुश आवले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
चिपळूण नगरपालिकेवर शिवसेना भाजपा युतीची पूर्ण सत्ता प्रस्थापित झाली आहे. नूतन नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा झाल्यानंतर विषय समित्यांचे सभापती निवडण्यात आले. त्यामध्ये शिवसेनेचे तीन आणि भाजपचे तीन सभापती बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर या नियोजन व विकास समितीच्या सभापती बनल्या तर पाणीपुरवठा सभापती निहार कोवळे, बांधकाम सभापती कपिल शिर्के, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रसिका देवळेकर व उपसभापती पल्लवी महाडिक, आरोग्य सभापती शुभम पिसे आणि शिक्षण व क्रीडा समितीच्या सभापती पदावर हर्षली पवार यांची एकमताने निवड झाली. या सर्व नूतन सभापतींचा पदग्रहण सोहळा आज शुक्रवारी वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. भाजपने नेते यादव, नगराध्यक्ष सकपाळ व गटनेते मोदी, आवले यांनी सभापतींना त्यांच्या दालनात स्थानापन्न करून प्रभावी काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सभापतींचे हितचिंतक आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▶ सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
