इन्फोसिस कंपनीने आपला तिमाही निकाल आज जाहीर केला. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या निव्वळ नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ६८०६ कोटी तुलनेत २% घसरण झाल्याने नफा ६६५४ कोटींवर पोहोचला आहे. तर कंपनीच्या महसूलात (Revenues) इयर ऑन इयर बेसिसवर ८.९% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यातील ४१७६४ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ४५४७९ कोटीवर वाढ झाली आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या एकूण ऑपरेटिंग खर्चात इयर ऑन इयर बेसिसवर ३.१% वाढ झाल्याने खर्च ३७३२ कोटीवरुन ४४७२ कोटींवर वाढला आहे. कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्यातही इयर ऑन इयर बेसिसवर ६.३% घसरण झाल्याने नफा ८९१२ कोटीवरून ८३५५ कोटींवर घसरला आहे.एक्सचेंजमधील माहितीनुसार, बेसिक ईपीएस (Earning per share EPS) इयर ऑन इयर बेसिसवर ०.५७ रूपयावरून ०.५८ रूपयावर किरकोळ वाढ झाली आहे.
देशातील क्रमांक दोन आयटी कंपनीचा तिमाही निकाल जाहीर इन्फोसिसच्या निव्वळ नफ्यात २% घसरण
