चिपळूण : नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे स्वायत्त महाविद्यालयाच्या वरिष्ठ वाणिज्य विभागातर्फे आयोजित करण्यात आलेला ‘उद्यम २०२६’ हा आंतरमहाविद्यालयीन उपक्रम मोठ्या उत्साहात आणि प्रतिसादात संपन्न झाला. संस्थेचे चेअरमन मंगेश तांबे यांच्या शुभहस्ते व प्राचार्य डॉ. बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे आणि त्यांच्यातील उद्योजकता कौशल्यांना प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमात रत्नागिरी जिल्ह्यातील 6 विविध कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांतील एकूण अंदाजे 102 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमांतर्गत तीन प्रमुख स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले:
- सिच्युएशनल क्रायसेस (कॉमर्स क्रॉस रोड): या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कठीण प्रसंगात निर्णय घेण्याची आपली क्षमता सिद्ध केली.
- पीपीटी प्रेझेंटेशन (स्पेक्ट्रूम): आधुनिक विषयांवर प्रभावी सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
- बिझनेस मॉडेल (मार्केट मॅनिफेस्ट) व ॲड-मॅड शो: विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण व्यवसाय मॉडेल्स आणि प्रभावी जाहिरातींचे सादरीकरण केले.
या स्पर्धेसाठी अंतर्गत परीक्षकांसोबतच बाहेरील तज्ज्ञांनाही आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये परीक्षक म्हणून प्रा. श्रीनिवास गोखले, प्रा. राहुल पवार, डॉ. संजना चव्हाण, सीए गुरुनाथ भिडे यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी स्पर्धकांच्या सादरीकरणाचे सूक्ष्म परीक्षण करून त्यांचे मार्गदर्शन केले.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी भाजपचे माजी सभापती श्री. शशिकांत मोदी उपस्थित होते.तीन प्रमुख स्पर्धा मध्ये प्रथम आणि द्वितीय नंबर ला अनुक्रमे एक आणि दोन हजाराचे पारितोषिक देण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी वरिष्ठ वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. ऋचा खावणेकर, प्रा.नेहा तांबे, प्रा. सायली फाळके यांचे सहकार्य लाभले. तसेच वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी पायल झुजम हिने केले तर आभार कुमारी प्रवरा ओक हिने मानले.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
