चिपळूण, ता. ५ : तालुक्यातील डेरवण येथील एसव्हिजेसीटीच्या क्रीडासंकुलात सुरु असलेल्या ” डेरवण युथ गेम्स २०२६ “अंतर्गत चार दिवस फुटबॉल सामन्यांचा थरार क्रीडाप्रेमींना अनुभवता आला.

मुलींच्या १७ वर्षाखालील गटात अंतिम फेरीत सॉक्कर ट्रेनिंग संघाने गिजवणे हायस्कूल या संघावर १ – ० अशी मात करत सामना जिंकला. या स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलांच्या गटाचा, अंतिम सामना स्वराज्य अकॅडमी कोल्हापूर व सॉक्कर ट्रेनिंग कोल्हापूर या दोन संघात खेळला गेला. हा सामना सॉक्कर ट्रेनिंग कोल्हापूर या संघाने ३ – १ या गुणांनी जिंकला, मात्र सामना संपताच स्वराज्य अकॅडमीच्या खेळाडूंनी अखिलाडू वृत्तीचे प्रदर्शन करून मैदानातच प्रतिस्पर्धाबरोबर धक्काबुक्की व हाणामारी करण्यास सुरुवात केली, परीणामी स्वराज्य अकॅडमी कोल्हापूर या संघास स्पर्धेतून बाद ठरविण्यात आले व त्यांच्यावर व शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. मुलांच्या १४ वर्षाखालील गटात अंतिम सामना सेंट झेवियर्स कोल्हापूर या संघाने, झील इंटरनॅशनल स्कूल सांगली या संघावर २ – १ अशी मात करीत जिंकला. तत्पूर्वी उपांत्य फेरीत सॉक्कर ट्रेनिंग कोल्हापूर (सी) या संघाला खेळाडूंच्या नियमबाह्य वयचोरी आक्षेपामुळे अपात्र ठरविण्यात आले.

तर १६ वर्षाखालील व्हॉलिबॉल स्पर्धेत मुलींमध्ये साताऱ्याच्या वाई व्हॉलीबॉल क्लबने व १६ वर्षाखालील मुलांमध्ये कोल्हापुरातील मुरगूड येथील शिवराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने विजेतेपदाला गवसणी घातली आहे.

यावर्षी व्हॉलिबॉल स्पर्धेत १६ वर्षाखालील मुलामुलींचे दोन्ही मिळून २८ संघ सहभागी झाले होते. मुलींमध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती येथील शारदा नगरच्या शारदा स्पोर्ट्स अकॅडमीने उपविजेतेपद पटकावले आहे. तर मुलांमध्ये सातारा जिल्ह्यातील वाई व्हॉलीबॉल क्लबने उपविजेतेपद पटकावले आहे.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH