चिपळूण, (प्रतिनिधी) : “केवळ मैदानावर घाम गाळून चालत नाही, तर जागतिक स्तरावरील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि खेळात स्वतःचे नाव कमावण्यासाठी खेळाडूंनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. संतुलित आहार हाच खेळाडूच्या यशाचा खरा पाया आहे,” असे प्रतिपादन डॉ. चंद्रजीत जाधव यांनी केले.
निमित्त होते, सावर्डे येथील विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘डेरवण युथ गेम्स’ च्या भव्य उद्घाटन सोहळ्याचे. यावेळी डॉ. जाधव मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
क्रीडा ज्योत पेटवून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
आपल्या मार्गदर्शनात डॉ. जाधव पुढे म्हणाले की, “आजच्या काळात स्पर्धा प्रचंड वाढली आहे. शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक स्थिरता महत्त्वाची असते, जी आपल्याला योग्य पोषक तत्त्वांमधून मिळते. खेळाडूंनी जंक फूड टाळून प्रथिने आणि जीवनसत्त्वयुक्त घरगुती आहाराला प्राधान्य द्यावे.”
या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उद्योजक कमलेश जोशी, रुग्णालय संचालिका डॉ. सौ. सुवर्णा पाटील, सौ. शरयू यशवंतराव, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, अजित गाळवणकर, संदीप तावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्रशिक्षक आणि मोठ्या संख्येने युवा खेळाडू उपस्थित होते. जाधव यांच्या या आश्वासक मार्गदर्शनामुळे खेळाडूंमध्ये नवा उत्साह पाहायला मिळाला.
एसव्हीजेसीटीच्या क्रीडासंकुलात ता. ६ मार्चपर्यंत अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुद्धिबळ, कॅरम, लंगडी, खो खो, कबड्डी, मल्लखांब, बास्केटबॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल अशा विविध खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी मुंबई, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद या राज्याच्या विविध भागांतून खेळाडू, संघ डेरवण येथे दाखल होत आहेत. सुमारे सात हजार खेळाडूंनी या क्रीडामहोत्सवात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. संघांमधील अटीतटीच्या लढती पाहण्यासाठी क्रीडाप्रेमीही येथे येऊ लागले आहेत.
यंदाही विजेत्यांना पदके, चषक आणि रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. १२०० पदके, ११५ करंडक स्पर्धेत खेळाडूंना बक्षीसरूपाने देण्यात येणार आहेत.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
https://sagarwave.com
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH
