खेड :- येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) या शैक्षणिक संस्थेच्या कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिर, भडगाव माध्यमिक विभागातील इ. १० वीमधील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांची अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातुन ९८:८०% गुण मिळविल्याबद्दल भारत सरकारची ‘डॉ आंबेडकर राष्ट्रीय शिष्यवृत्ती’ रोख रक्कम १०,०००/- रु. (रु. दहा हजार मात्र) प्राप्त झाल्याबद्दल वेदिकाचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
कु. वेदिकाच्या या उज्जवल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ.श्री. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढ्ढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
