गुहागर : शहरात स्वच्छता अभियान डॉ. श्री नाना साहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाने स्वच्छता अभियानात सुमारे सहा टन ओला व सुका कचरा संकलन केला या प्रतिष्ठानचे सर्व क्षेत्रात गौरवास्पद काम असते असे प्रतिपादन गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी केले. ते स्वच्छता अभियानाच्या सांगता समारंभात बोलत होते.
या प्रतिष्ठान मार्फत रक्तदान शिबिर, झाडे लागवड करणे, झाडांचे संगोपन करणे यासारखे अनेक उपक्रम होत असतात. श्री सदस्य हे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने करत असतात. भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छतादूत डॉ.श्री. नाना साहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा चे अध्यक्ष पद्मश्री पूरस्कार सन्मानित डॉ.श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ.श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर शहरामध्ये स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
या अभियानांतर्गत गुहागर न्यायालय ते बाजारपेठ, श्री व्याघ्रंबरी देवस्थान वरचापाट ते महावितरण कार्यालय व सर्व शासकीय कार्यालयात हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात गुहागर तालुक्यातील पाच श्री सदस्य बैठकीतील सदस्य स्वच्छता मोहिमेत एकुण २२० श्री सदस्यांनी या अभियानात १.२५० टन ओला कचरा व ४:४०५ टन सुका कचरा गोळा करून नगरपंचायत डंपिंग ग्राऊंड येथे गोळा करून टाकण्यात आला.
, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. स्वप्निल चव्हाण, उपनगराध्यक्ष श्री.प्रदिप बेंडल, आरोग्य सभापती श्री. सजित साटले, बांधकाम सभापती श्री. उमेश भोसले, नगरसेवक श्री. समिर बागकर, श्री.सुधाकर कांबळे, मुख्याध्यापक,
श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विदयामंदिर गुहागर पत्रकार . मनोज बावधनकर, श्री. गणेश धनावडे, ,तसेच पोलिस कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
