सुतारवाडी ( वार्ताहर ): गेली अनेक दिवसांपासून रोहे तालुक्यात विशेषतः सुतारवाडी परिसरात अज्ञात स्त्री व पुरुष मंडळीकडून अनेक स्थानिक नागरिकांशी मोबाईलद्वारे संवाद साधत फावणे होत येत असल्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.
तुमच्या मित्राने कर्ज काढलेले आहे.त्याचे हप्ते अनेक महिन्यांपासून थकलेले असून कर्जाची रक्कम वाढत असून तुम्ही त्याला जामीनदार आहात.तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी लगेच आम्हला सांगा.तसेच रक्कम ताबडतोब भरा.असे सांगून फसवणाऱ्या टोळीकडून बनवाबनवी केली जात आहे.या दरम्यान जर एखाद्या व्यक्तीने त्यांना प्रतिसाद दिला नाही तर त्या व्यक्तीस गलिच्छ शिव्या दिल्या जात असल्याचे धक्कादायक प्रकार देखील घडत आहेत.फसवे फोन आणि शिव्या ऐकूण जनेतेत संतापाची लाट पसरली आहे.काही त्रस्त नागरिकांनी या बाबत पोलिसांना देखील कल्पना दिली आहे.अनोळखी इसमांकडून मोबाईलवर आलेला मेसेज साऱ्यांना धोकादायक ठरत आहे. या फसव्या आणि बनावट फोनमुळे काही मंडळींचे बँक खाते रिकामे झाल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत.अज्ञात व्यक्तीने केलेले फोन,पाठवलेला मेसेज
हा घातक असून कोणी त्यास बळी पडू नये.सध्या काही भागात चोरांचा आणि बोगस फोनद्वारे लुटण्याचा प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहे. याबाबत नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे.असे आवाहन पोलीसांनी केले आहे..
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
