गुहागर ( वार्ताहर ) : गुहागर आगारात प्रथमच सार्वजनिक स्वरूपात छ. शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमात कु पूजा शिवाजी आवळे या विद्यार्थिनीचे भाषण लक्षवेधी ठरले.
गुहागर आगारात दरवर्षी प्रशासकीय जयंती साजरी होते मात्र यावर्षी प्रथमच सार्वजनिक स्वरूपात छ शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी झाली सर्व प्रथम आगार प्रमुख अशोक चव्हाण यांचे सह गुहागर तालुका प्रवाशी संघटना अध्यक्ष पराग कांबळे व सर्व प्रशासकीय अधिकारी यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले त्या नंतर छ शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करून आगार प्रमुख अशोक चव्हाण यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष पराग कांबळे आगार प्रमुख अशोक चव्हाण सहाय्य्क कार्यशाळा अधिकारी मंदार कदम आगार लेखा कार स्नेहल पालकर वरिष्ठ लिपिक शंकर केंद्रे प्रवीण वळंजू रविवारी घाग सुनील पवार अस्मित चव्हाण राजा गायकवाड गणेश वालम सिद्धेश लाकडे रविकुमार गायकवाड दिलीप रिंडे के डी सकपाळ सुषमा घोंगे अश्विन शेठ केशव दांडेगावकर प्रवीण भांगरे आर बी गायकवाड रामा पुंड यांचे सह चालक वाहक व प्रवाशी तसेच अधिकारी व कर्मचारी यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थिती त होते
यावेळी आपल्या प्रास्ताविक मध्ये बोलताना रामा पुंड यांनी छ शिवाजी महाराज यांचे कार्याचा गौरव केला तर आगार प्रमुख यांनी उपस्थितीताना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामा पुंड यांनी केले कार्यक्रमामध्ये छ शिवाजी महाराज याने नावाने घोषणा नाद करून वातावरण आनंदित करण्यात आले यावेळी सर्वांना आगाराच्या वतीने मोती चुर बुंदीचे लाडू वाटप करून जयंतीचा गोडवा वाढविण्यासाठी सर्वांनी मेहनत करून कार्यक्रम यशस्वी करण्यात आला

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY