खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जामगे गावची ग्रामदैवत असलेल्या कोटेश्वरी मानाई देवी मंदिर येथे शिमगोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. पारंपरिक पद्धतीने सहानेवरील पालखीमध्ये विराजमान झालेल्या देवीची गावकऱ्यांनी खणा-नारळाने ओटी भरून पूजा केली.
यावेळी गावचे सुपुत्र आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम, राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम, जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम, तरुण उद्योजक अनिकेत कदम तसेच उद्योजक शैलेशशेठ कदम आदी कदम कुटुंबीय व परिवार उपस्थित होते. त्यांनी देवीची मनोभावे पूजा करून ग्रामदैवताचे आशीर्वाद घेतले.
मंदिर परिसरात ढोल-ताशांचा गजर, खालूबाजा तसेच सनई-चौघड्यांच्या निनादात पारंपरिक शिमगोत्सवाची रंगत खुलून दिसत होती. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवात सहभाग नोंदवला. पारंपरिक वेशभूषा, भक्तिगीत आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे जामगे गावात भक्ती आणि संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.
शिमगोत्सवाच्या निमित्ताने गावात सामाजिक एकोपा आणि परंपरेचे जतन करण्याचा संदेशही देण्यात आला. ग्रामदैवताच्या आशीर्वादाने गावात सुख-समृद्धी आणि ऐक्य नांदो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH