खेड : (चंद्रकांत बनकर): जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी कोकणाच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करण्याची ठाम भूमिका जाहीर केली आहे.

“आता जिवंत असेपर्यंत लक्ष फक्त कोकणावरच; विकास आणि रोजगार हाच माझा एकमेव अजेंडा आहे,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.
खेड तालुक्यातील विविध जाहीर सभा व लोकसंवाद कार्यक्रमांमध्ये बोलताना रामदास कदम यांनी आपल्या कार्यकाळाचा आढावा घेतला. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री म्हणून काम करत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या, प्लास्टिक बंदीसारखे कडक आणि जनहिताचे निर्णय घेतले. मात्र आता उर्वरित आयुष्य कोकणाच्या विकासासाठीच समर्पित करणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
कोकणातील तरुणांसाठी स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती, लघुउद्योगांना प्रोत्साहन, महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे, हा विकासाचा केंद्रबिंदू असेल, असे कदम यांनी स्पष्ट केले. पर्यटन, प्रक्रिया उद्योग, मत्स्य व्यवसाय आणि ग्रामीण उद्योगांच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता आणण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
तसेच आगामी जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी झाल्यास रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण आणि अन्य पायाभूत सुविधांच्या विकासकामांना गती दिली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोकणाचा विकास, रोजगारनिर्मिती आणि सर्वसामान्यांच्या जीवनमानात सुधारणा हेच शिवसेनेचे ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY