कल्याण (प्रतिनिधी) : शिवसेना ठाकरे गटाचे कल्याणमधील नवनिर्वाचित चार नगरसेवक अद्यापही नॉट-रीचेबल असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी थेट पोलीस ठाण्यात मिसिंग संदर्भात लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे. नॉट-रीचेबल असलेल्या नगरसेवकांचा शोध घेण्यासाठी ही अधिकृत तक्रार करण्यात आली आहे.नगरसेवकांच्या जीवाला धोका आहे की त्यांचे अपहरण झाले आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्ससह तांत्रिक तपास करण्यात यावा, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
तसेच संबंधित नगरसेवक जिथे कुठे असतील, तिथून माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
वरिष्ठांच्या आदेशानंतरच ही तक्रार दाखल करण्यात आल्याचे स्पष्टीकरण जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी दिले आहे
▶ सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
https://sagarwave.com
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
