चिपळूण: गोवळकोट येथील श्री देव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानात उद्या शनिवार दि.२८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता देवस्थानचे अध्यक्ष ॲड. प्रसाद अ. चिपळूणकर यांच्या हस्ते व विश्वस्त कमिटीच्या उपस्थितीत महान संत परमपूज्य हरभटबाबा पटवर्धन यांच्या तैलचित्राचे अनावरण देवस्थानात आयोजित करण्यात आले आहे.

ब्रह्मीभूत पटवर्धनबाबा हे सोळाव्या शतकात बुद्धिदैवत गजानन यांचे महान उपासक होऊन गेले. त्यांना प्रत्यक्ष आदिशक्ती श्री करंजेश्वरी आणि श्री बालाजी भगवान यांचे दर्शन झाले. आयुष्यभर गोरगरिबांची सेवा करण्यात त्यांनी धन्यता मानली. त्यांनी गजाननाची उपासना करून जनतेच्या हितासाठी गणेशालाही प्रसन्न करून घेतले होते. पेशवेही त्यांच्या दर्शनाला जात आणि मार्गदर्शन घेत असत. पेशव्यांनी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराच्या पाठीमागे हरभटबाबा यांची समाधी बांधली आहे.ते पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष आहेत आणि पटवर्धन घराण्याची श्रीदेवी करंजेश्वरी ही कुलस्वामिनी आहे. त्यामुळे देवस्थानामध्ये उद्या सकाळी महान संत परमपूज्य हरभटबाबा यांच्या तैलचित्राचे अनावरण होत असून यावेळी सर्व भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH