चिपळूण: भक्तांचे श्रद्धास्थान श्री देव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानचा शिमगा महोत्सव २८ फेब्रुवारीपासून सुरू होत असून २मार्च रोजी पेठमापच्या विस्तीर्ण मैदानावर शेरणे काढण्याचा कार्यक्रम होणार आहे.

सोमवार दि.२ मार्च रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत पेठमापच्या विस्तीर्ण मैदानावर शेरणे काढण्याचा सोहळा होणार आहे. या उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून नगरसेवक विकी लवेकर, नगरसेवक प्रमोद बुरटे तसेच स्थानिक युवा कार्यकर्ते नितीन चिखले, निलेश किंजलकर, राकेश देवळेकर,महेश बुरटे, महेश शिंदे, समीर वरवाटकर,सिद्धेश रेडीज, संदीप आंबुर्ले, निखील शेटे यांच्या देखरेखीखाली मैदान सुसज्ज करण्यात येत आहे.
या कामासाठी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, देवस्थानचे अध्यक्ष ॲड.प्रसाद चिपळूणकर व सर्व विश्वस्त तसेच जलसंपदा विभागाचे सहकार्य लाभले आणि स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी येऊन मार्गदर्शन केले अशी माहिती तरुण कार्यकर्त्यांनी दिली.
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
