जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पार पाडल्या यात खालापूर तालुक्यात पंचायत समितीमध्ये महायुतीने आठ पैकी पाच जागा जिंकून पंचायत समितीवर भगवा फडकवण्यात आला. यात पंचायत समिती आठ पैकी भारतीय जनता पक्षाला तीन,शिवसेना शिंदे गटाला दोन ठाकरे गटाला दोन व राष्ट्रवादीला एक अशा जागांवर विजय मिळवता आला. रायगड जिल्ह्यात आतकरगाव जिल्हा परिषद गटामध्ये व पंचायत समिती गणामध्ये जिल्ह्याचे लक्ष लागले होते या निवडणुकीत शिंदे गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील यांच्या रेश्मा पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अंकीत साखरे यांच्या पत्नी श्रद्धा साखरे यांच्यातच खरी लढाई पहावयास मिळाली त्यात मोठ्या प्रमाणात प्रचाराची रणधुमाळी पहावयास मिळाली राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी या मतदारसंघात हजेरी लावून मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजयी करण्याचे आवाहन केले होते मात्र जिल्हा परिषद माजी सभापती नरेश पाटील यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे राखण्यास यश मिळाले त्यांच्यासोबतच पंचायत समिती गण भाई शिंदे हेही विजयी झाले भाई शिंदे हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष होते या जागेवर हाय व्होल्टेज ड्रामा होता, त्यामुळे, या जागेवर चूरशीची लढाई पाहायला मिळाली. जिल्हा परिषद च्या चार जागांवर चारी पक्षांना प्रत्येक एक जागा मिळाली शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, उभाटा गट व भाजप, त्यामुळे मतदारांनी चारी पक्षांना खुश केले. या निवडणुकीत त मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे समजते.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
