खेड : खेड, दापोली व पोलादपूर तालुक्यातील बंद देवळांमधून समई व घंटा चोरी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना खेड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल ६ लाख ५५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी राकेश तुळशीराम पडवकर (वय ३७, रा. लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे) व जगलाल रामनरेश केवट (वय ५०, रा. खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड जिल्हा) अशी नावे आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या आदेशानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी व उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विवेक अहिर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. पोलीस उपनिरीक्षक रोहीदास केंद्रे तसेच पोलीस कर्मचारी अजय कडू, विजेंद्र सातार्डेकर, वैभव ओहोळ, कृष्णा दराडे व शिरीष साळुंके यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
रविवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास खोपोली परिसरात संशयास्पद हालचाली करत असताना पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींकडून सुमारे १०० किलो वजनाच्या पितळी समया व घंटा असा एकूण ६ लाख ५५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरातील देवस्थानांवरील चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY