चिपळूण (विशेष प्रतिनिधी ):आम्हाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी आम्ही जनतेने दिलेला कौल स्वीकारला असून समाधानी आहोत अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रशांत यादव यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
ते म्हणाले की, ज्या काही चुका झाल्या असतील त्या सुधारू, निकालावर चिंतन करू असे सांगून ते म्हणाले की आमच्यात थोडा समन्वय कमी पडला.
राष्ट्रवादीचा सभापती बसेल ही अट मान्य असलेल्या पक्षाबरोबर युती करू असे आमदार निकम यांनी म्हटले आहे या संदर्भात प्रतिक्रिया देताना यादव म्हणाले की, यासंदर्भात तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसून निर्णय घेतील.
एका प्रश्नावर ते म्हणाले की, खेर्डी म्हणजे आमचीच हा भ्रम ज्या लोकांचा होता तो भ्रम उद्ध्वस्त झाला आहे. जनतेने विकास कामांना पसंती दिली आहे आणि कार्यकर्त्यांची कामे करणाऱ्या उमेदवारांना निवडून दिले आहे. खेर्डी कोणाला आंदण दिलेली नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
[16:31, 09/02/2026] Sunil Salvi: चिपळूणच्या निकालावर भाजप नेते प्रशांत यादव म्हणाले, अपेक्षित यश नाही पण समाधानी.. खेर्डी कोणाला आंदण दिली नाही..!
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
