खोपोली – खोपोली नगर परिषदेच्या ढिसाळ व निष्क्रिय कारभारामुळे एका ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला अक्षरशः रस्त्यावर उतरून न्यायासाठी कपडे काढून आंदोलन करावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

खोपोली येथील रहिवासी श्री. कस्तुरचंद चुनाजी राठोड हे गेल्या पाच वर्षांपासून त्यांच्या घरासमोरील गटार बांधकामासाठी नगर परिषदेचे उंबरठे झिजवत आहेत. तब्बल 100 वेळा फेऱ्या मारूनही नगर परिषद प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अखेर प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून श्री. राठोड यांनी खोपोली नगर परिषदेचे नगर अभियंता अनिल वाणी यांच्या कार्यालयात थेट त्यांच्या समोर अर्धनग्न होत आंदोलन केले.
“अधिकाऱ्यांची पोटं भरत नसतील तर आमचे कपडे घ्या, पण आमचे काम करा,” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित करत आपली व्यथा मांडली.

एका ज्येष्ठ नागरिकाला न्यायासाठी अशा टोकाच्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणे हे खोपोली नगर परिषदेच्या बेजबाबदार कारभाराचे जिवंत उदाहरण असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.

या घटनेनंतरही नगर परिषद प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होते की नाही, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
तात्काळ गटाराचे काम सुरू करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY