खोपोली : तहसील कर्मचारी वेळवर उपस्थित राहत नाही त्यामुळे सर्वसामान्यांची कामे होत नाहीत अशा स्वरूपाचा लेखी निवेदन मनसे तालुका अध्यक्ष अतुल हडप व कार्यकर्ते यांनी तहसीलदार अभय चव्हाण यांना दि ले व तहसील कार्यालयात कर्मचारी व स्टाफ वेळेवर येत नसल्याचा आरोप केला असता काही काळ कार्यकर्ते व तहसीलदार यांच्या शाब्दिक वाद झाला.
तहसीलदार अभय चव्हाण यांनी कोणाची कामे होत नाही त्यांना माझ्याकडे पाठवा, आमच्याकडे कुठलीही कामे शिल्लक नाहीत असे सांगताना शासकीय कार्यक्रम व बैठका यामध्ये स्टाफ व कर्मचारी व्यस्त असतात असे तहसीलदार यांनी मनसे कार्यकर्त्यांन सांगताना तुम्ही चमकोगिरी करू नका व माझ्या कार्यालयात व्हिडिओ शूटिंग करता येणार नाही असे सांगितले परंतु काही काळ उभयतांमध्ये शाब्दिक वाद झाला यात तहसीलदार अभय चव्हाण यांनी तालुकाध्यक्ष हडप यांनी लिहिलेले निवेदन फाडले व कचऱ्याच्या डब्यात टाकले यावरून मनसे सैनिक संतप्त झाले व त्यांनी तहसील कार्यालय बाहेर तहसीलदार विरोधात निदर्शने केली व शासकीय जीआर पाडल्याचा आरोप केला. या घटनेमुळे तहसील कार्यालय परिसरात खळबळ उडाली. याचवेळी तहसीलदार यांच्या दालनात नायब तहसीलदार उपस्थित होते.
तहसीलदारांनी शासकीय जीआरची प्रत फाडली याबाबत आम्ही वरिष्ठानकडे तक्रार करणार असल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी सांगताना,तहसील कार्यालय बाहेर येऊन तहसीलदार चव्हाण यांच्या विरोधात त्यांनी जोरदार निदर्शने केली.आपण कुठलाही शासकीय जीआरची प्रत फाडली नसून कार्यकर्त्यांनी दिलेली ती माझ्या टेबलावर आहे….
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻