चिपळूण: तालुक्यातील मालघर हनुमान ग्रामस्थ मंडळ, किलजेवाडी यांच्या आयोजनाखाली आणि किलजेबंधू यांच्या विशेष सहकार्याने पार पडलेल्या किलजेवाडी प्रीमियर लीग २०२६ पर्व ३रे या भव्य अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उत्साहात संपन्न झाला. रोमांचक लढतीत श्री. प्रकाश किलजे व श्री. दशरथ किलजे यांच्या नेतृत्वाखालील ‘चॅम्पियन ९’ संघाने विजेतेपद पटकावले, तर श्री. केतन कांबळी यांच्या ‘लक्ष्मीकांत ग्रुप’ संघाने उपविजेतेपद मिळवले.

स्पर्धेत एकूण सहा संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत रंगली. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत ‘चॅम्पियन ९’ संघाने प्रतिस्पर्ध्यावर मात करत चषकावर आपले नाव कोरले.वैयक्तिक पुरस्कारांमध्ये कु. आकाश जाधव यांना मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. कु. साईराज महाडिक यांना उत्कृष्ट गोलंदाज, तर श्री. सुरज वाजे यांना उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच दत्तवाडी, मिरजोळी गावचा कु. संकेत फाग यांना बेस्ट आयकॉन प्लेयर म्हणून सन्मानित करण्यात आले. विजेत्या व गुणवंत खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते चषक व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मालघर गावातील ग्रामस्थ, मान्यवर आणि श्रमिक तसेच आर्थिक सहकार्य करणाऱ्यांचे आयोजकांनी विशेष आभार मानले. तसेच सर्व संघमालक श्री. दिनेश किलजे, श्री. तुषारशेठ खेड़ेकर, श्री. केतन कांबळी, श्री. प्रकाश किलजे, श्री. दशरथ किलजे, श्री. विशाल पवार, कु. यश लटके, श्री. संदीप घोले व कु. प्रेम घोले यांचेही मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
सहभागी सर्व खेळाडूंचे आभार मानत भविष्यातही समस्त मालघरवासीयांचे असेच सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY