खेड /रत्नागिरी : संपूर्ण महाराष्ट्रात वेगळेपण जपणाऱ्या कोकणातील प्रमुख पारंपरिक सण असलेल्या शिमगोत्सवाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील शिवसेनेचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी कोकणात येणाऱ्या लाखो चाकरमाण्यांना शिमगोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शिमगोत्सव हा कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असून दरवर्षी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या गावी परततात. गावागावात पारंपरिक पद्धतीने होळी, पालखी, तसेच विविध लोककलेच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे संपूर्ण कोकणात भक्तीमय व उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी रामदास कदम यांनी चाकरमाण्यांना संदेश देताना, कोकणात प्रवास करताना वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत, सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि शिमगोत्सव आनंद, उत्साह व भक्तिभावाने साजरा करावा, असे आवाहन केले. तसेच हा सण कोकणच्या संस्कृतीचे प्रतीक असल्याने सर्वांनी एकत्र येऊन परंपरा जपण्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, शिमगोत्सवाच्या निमित्ताने कोकणातील बाजारपेठा, गावांची वेशभूषा आणि देवस्थान परिसर सजले असून चाकरमाण्यांच्या आगमनाने गावागावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH